शिवराज्याभिषेकदिनी आम.प्रमोद जठार यांनी घेतली गोपाळगडावर शपथ
गुहागर | प्रतिनिधी :
गोपाळगड किल्ल्याचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी माझ्यासह सर्व मावळ्यांवर आहे.अशी शपथ शिवराज्याभिषेकदिनी आम.प्रमोद जठार यांनी येथील ऐतिहासिक गोपाळगडावर घेतली.
खाजगी मालकी हक्काच्या वादावरून व्हायरल व्हिडीओने गेले काही दिवस गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील शिवकालीन ऐतिहासिक गोपाळगड किल्ला पुन्हा चर्चेत आला.त्यामुळे शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड संकेत साळवी यांनी देखील हा किल्ला जनतेचाच आहे असा खुलासा केला होता.यानंतर प्रशासन व शासन स्तरावर देखील हा किल्ला राज्यशासनाच्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
यावेळी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, नगराध्यक्षा नीता मालप, राजेश बेंडल, तालुका सरचिटणीस सचिन ओक, यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर यांच्यासह जि.प.सदस्य,पं.स.सदस्य, नगरसेवक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













