राजापूर आगाराला आणखी गाडया मिळणार –आ. किरण सामंत राजापूर प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राजापूर आगाराला नवीन पाच राजमाता जिजाऊ गाडया उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आ. किरण सामंत यांनी प्रवाशांना चांगली सेवा द्या असे आवाहन करतानाच राजापूर आगाराला आणखी नवीन गाडया देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
राजापूर आगारातील बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आ. किरण सामंत यांच्या माध्यमातुनच यापुर्वी राजापूर आगाराला दहा लालपरी गाडया उपलब्ध झाल्या आहेत. आता पुन्हा नव्याने पाच राजमाता जिजाऊ गाडया ही आ. सामंत यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. आणखी लालपरी दहा व राजमाना जिजाऊ दहा नवीन गाडया उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.
या शुभारंभ प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राजापूर आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.