गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील जानवळे गावची सुकन्या व लिटिल चॅम्प्स जानवळेची विद्यार्थिनी मंजिरी जानवळकर हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जानवळे गावाच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तिच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
जानवळे गावची सुकन्या कु. मंजिरी विकास जानवळकर हिने जानवळे येथील लिटिल चॅम्प्स
स्कूल मध्ये इयत्ता दहावीमध्ये ९४.४०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. या सत्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, पत्रकार गणेश किर्वे, जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर, मनसे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, विकास जानवळकर, विवेक जानवळकर, पार्थ जानवळकर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आदि मान्यवर उपस्थित होते.









