अखेर एक महिन्या नंतर तुळस तलाठी झाले हजर : कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालय गजबजले

वेंगुर्ले : प्रतिनिधी
गेला एक महिना तुळस चे तलाठी केशव खंडेराव धुमाळे हे गैरहजर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय होत होती. या बाबत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष शामसुंदर राय यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज गुरुवार पासून तुळस येथे तलाठी सेवेत हजर झाले. त्यामुळे राय यांनी महसूल विभाग आणि तहसीलदार यांचे आभार मानले आहेत.

तुळस चे तलाठी कार्यालय आहे पण कार्यालयात तलाठी नाही अशी परिस्थिती होती. शेतकरी व ग्रामस्थांचे गैरसोय होत होती. तुळस गावामध्ये ४४०९ एवढी लोकसंख्या असून यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे उत्पन्न दाखले व पीक कर्ज घेणाऱ्यांचा सात बारा वर इ कर बोजा चढवणे व या व्यतिरिक्तही कामे शेती अंगामध्ये अडकलेली असल्यामुळे शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय येथे संघटनेच्या माध्यमातून तलाठी तात्काळ हजर राहावे याकरिता श्री. राय यांनी संघटनेच्या माध्यमातून लक्ष वेधले असता आज रोजी सकाळी अकरा वाजता तलाठी हजर राहून त्यांनी आपला कार्यभार हाती घेतलेला आहे त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे तुळस गावातील ग्रामस्थ व शेतकरी व विद्यार्थी मधून समाधान व्यक्त होत आहे.