नगरसेवक प्रवीण छेडा यांचा वेदपाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

जैन जिहाद शब्द चूकीचा – नगरसेवक प्रवीण छेडा

मुंबई – प्रसाद वेदपाठक या सोशल इंफ्ल्यूनसर ने त्यांच्या सोसायटीत व्हाईट पट्टा मारल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. हा पट्टा हटवावा म्हणून आवाज उचलला होता. मात्र आता वेदपाठक यांच्या विरोधात जैन समुदाय आणि भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आज पोलीस उपायुक्त पूर्व २ यांची भेट घेऊन वेदपाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वेदपाठक यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये ‘जैन जिहाद’ असा उल्लेख केला, दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली आहे. यामुळे आता वेदपाठक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.