कांबळेवीर विठ्ठल रखुमाई मंदिरात ‘नाद भजना ‘ चा भजन स्पर्धा

श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजारच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजारच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार १४ ऑगस्ट व मंगळवार १५ ऑगस्ट रोजी कामळेवीर विठ्ठल रखुमाई मंदिरात भजन स्पर्धात्मक ‘नाद भजना ‘चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक- श्री रुपेश कानडे.अध्यक्ष भाजप युवा मोर्चा मंडळ, कुडाळ यांजकडून ५००१ रु, द्वितीय पारितोषिक- श्री. सचिन रेडकर, सामाजिक कार्यकर्ते यांजकडून -३००१ रु,तृतीय पारितोषिक- सौ स्वप्ना वारंग माजी पंचायत समिती सदस्य यांजकडून -२००१ रु, उत्तेजनार्त -श्री रमेश वायगणकर यांजकडून -१००१ रु तसेच वैयक्तिक बक्षिसे -शिस्त बद्ध मंडळ,श्री संदीप होडावडेकर यांजकडून १००१ रु उत्कृष्ट गायक- श्री महेश वराडकर यांज कडून -५०१ रु,उत्कृष्ट हार्मोनियम -श्री अक्षय पेडणेकर यांजकडून -५०१ रु उत्कृष्ट पखवाज- श्री सुभाष वेंगुर्लेकर यांजकडून -५०१ रु, उत्कृष्ट तबला -श्री मंथन रेडकर यांजकडून -५०१ रु, उत्कृष्ट कोरस- श्री प्रवीण रेडकर यांज कडून -५०१ रु.तसेच सर्व भजन मंडळाना मोहम्मद पटेल यांजकडून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत
सोमवार दि. १४ ऑगस्ट
सायं – ६ वा -स्वामी समर्थ प्रा. भजन मंडळ आडेली.
सायं -६.४५ वा -नटराज भजन मंडळ पिंगुळी.
सायं -७.३० वा -श्री सिद्धेश्वर प्रा भजन मंडळ वायगणी सुरणगपाणी
रात्री -८.१५ वा -श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावलं
रात्री ९ वा -कलेश्वर प्रा भजन मंडळ वेत्ये.
तर
मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी
सायं -६ वा -श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ निरवडे.
सायं -६.४५ वा -श्री गोठण प्रा भजन मंडळ वजराठ
सायं -७.३०वा -श्री मुसळेश्वर प्रा भजन मंडळ मळेवाड
रात्री -८.१५ वा -श्री विठ्ठल रखुमाई प्रा भजन मंडळ आंदुर्ले
रात्री -९ वा -श्री रवळनाथ प्रा भजन मंडळ पाडलोस अशी भजने सादर केली जाणार आहेत.
तरि या सर्व भजन स्पर्धेचा भजन प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ कामळेवीर बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.