चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी जेईई/एनईईटीच्या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली आहे. चिपळूणमध्ये रिगलने प्रथमच कोटा पॅटर्न आणला आहे. याच अनुषंगाने सीबीएसई बोर्डचे ११वी सायन्स कॉलेज देखिल सुरु करण्यात आले आहे.
शिक्षण गेली १५ वर्ष व्यवसायाभिमुख देण्याच्या रिगल महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन धाडसी पाऊल टाकले आहे. जेईई/नीटच्या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली असून त्यासाठी कोटा येथील तज्ज्ञ व १० वर्षाहून अधिककाळ अनुभव असलेले प्राध्यापक वर्ग चिपळूण येथे कायमस्वरूपी राहून दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस ते विद्याथ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोकणात प्रथमच २ वर्षाचा फुल्ली इंटिग्रेटेड प्रोग्रम राबविण्यात येत असल्याने त्याचा अधिकचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. जेईई/नीटच्या साठी दोन स्वतंत्र अभ्यासवर्ग यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिले आहेत. ८० टक्के ते ९० टक्के सीबीएसईचा व ६० ते ६५ टक्के स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम जेईई / नीटच्या मध्ये असल्याने रिगल कॉलेजने सी. बी. एस. ई. बोर्डचे ११-१२ वी सायन्स कॉलेज देखील सुरु केले आहे. गेल्या दोन वर्षात रिगल कॉलेजने चांगला निकाल दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
महाविद्यालयाची विद्यार्थिनी राजसी माने हिची एम्स हैदराबाद येथे एम.बी.बी.एस. साठी, श्रिया इदाते हिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे, सृष्टी पाटील हिची देखील शासकीय इंजीनिअरिंग कॉलेजे येथे निवड झाली आहे.
यावर्षीच्या विद्यार्थ्यांनी जे.ई.ई.मेन्स परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. ज्यामध्ये कु. अक्सा चौगुले हिला ९६.०१ पर्सेंटाइल, सफवान म्हातारनाईक याला ९१.२३ पर्सेंटाइल तर साश्वी मिश्र हिला ९०.३८ पर्सेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. इयत्ता ११ वी च्या पहिल्या दिवसापासून जेईई/नीटचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जेईई/नीटच्या अभ्यासवर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्याला चांगला प्रतिसाद देखिल लाभत आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी रिगल कॉलेज कोंढे, गुहागर रोड, चिपळूण ७७६८९८८५८४, ८३२९१०४८७८६ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.regalcollege.in संकेत स्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.












