कोंडकारूळ येथील भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा सत्कार

गुहागर प्रतिनिधी :

गुहागर तालुक्यातील कोंड कारुळ येथील भजनी कलावंत विश्वास मोहन पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .त्यावेळी माजी नगरसेवक संजय मालप ,महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील ,ऍड प्रसाद जांगळी ,कार्यक्रम समन्वयक नितीन घरट, सौ अनघा घरटं, कोंड कारूळ येथील ग्रामस्थ श्री सुधीर नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.श्री विश्वास मोहन पावसकर भजनी बुवा यांनी गंगामाता बालमित्र भजन मंडळाच्या वतीने गेली तीस ते पस्तीस वर्ष भजनाची परंपरा कायम ठेवली आहे.विश्वास पावसकर हे कोकण भूषण सम्राट बुवा चंद्रकांत कदम यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात .त्यांनी गुहागर तालुक्यामध्ये कारुळ, अंजनवेल ,आरे , वेळनेश्वर, हेदवी ,करदे, अडूर ,बोऱ्या इत्यादी ठिकाणी भजन कला सादर केली आहे.गेले अनेक वर्ष भजनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कला जोपासण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानने त्यांच्या कामाची दखल घेऊन गुहागर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान केला .त्याबद्दल त्याचे महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे सल्लागार व संचालक मंडळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.