गुहागर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर चालवतात खाजगी दवाखाना…

भाजपा महिला आघाडी अध्याक्षा प्रांजली कचरेकर यांची कारवाईची मागणी
गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीवर रुजू असलेले डॉक्टर निलेश ढेरे हे ग्रामीण रुग्णालय मध्ये सुद्धा काम करत असून तसेच ते खाजगी आपला दवाखाना चालवत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील आलेल्या रुग्णांना योग्य प्रकारे सेवा देत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने डॉक्टर ढेरे यांना तात्काळ या वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयातून बडतर्फ करावे अशा मागणीचे निवेदन आज महिला आघाडी भारतीय जनता पार्टी अध्यक्षा सौ प्रांजली कचरेकर यांनी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलवंत यांच्याकडे दिले. गुहागर रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले डॉक्टर निलेश ढेरे हे गेले अनेक वर्ष या गुहागर मध्ये कार्यरत आहेत. त्यांचा स्वतःचा खाजगी दवाखाना गुहागर शहरामध्ये आहे. त्यामुळे अर्धवेळ ग्रामीण रुग्णालय आणि अर्धवेळ हे खाजगी दवाखान्यासाठी ते देत आहेत. त्यांच्या खाजगी दवाखान्यामुळे त्यांचे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांकडे लक्ष देत नसल्याचे वारंवार तक्रारी होत्या. ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांना आपल्या खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करत आहेत. अशाही रुग्णांच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे तात्काळ संबंधित डॉक्टर यांच्यावर कारवाई व्हावी. अशा पद्धतीचे निवेदन प्रांजली कचरे कर यांनी आज दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेश पवार. महिला शहराध्यक्ष स्मिता जांगली. प्रशांत कचरेकर, दशरथ जांगली,सतीश शिरधनकर उपस्थित होते.