21 जून रोजी प्रसारण
रत्नागिरी: आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या बालजगत या कार्यक्रमात ‘संवादिनीची सुरेल सफर’ हा विशेष कार्यक्रम रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये संवादिनी या वाद्याच्या सुरेल विश्वाची ओळख करून देत बालकलाकार आपली कलागुणांची मनमोहक प्रस्तुती सादर करणार आहेत. कार्यक्रमात हृषिकेश विनय मोंडकर, गिरीजा विश्वेश भिडे, स्वरूपा मंदार आठवले आणि आर्या संजय काटदरे यांचा सहभाग आहे.त्यांना प्राची निखिल रानडे यांच मार्गदर्शन मिळालं आहे.
कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केले असून सादरीकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यमलहरी ११४३ किलोहर्ट्झ आणि एफ.एम. १०१.५ मेगाहर्ट्झवर ऐकता येईल. तसेच Newsonair मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube वरील airratnagiri1248या वाहिनीवर श्रोत्यांना उपलब्ध होणार आहे.
बालकलाकारांच्या सुरेल सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.












