माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत काताळे येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील काताळे ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत समता फाउंडेशन व भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले. याकरता प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली, उपकेंद्र तवसाळ खुर्द यांच्या सर्व टीमने विशेष सहकार्य केले.महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होण्याबरोबर आरोग्याच्या सुधारणा होण्याच्या दृष्टीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तवसाळ खुर्द, तवसाळ ,काताळे महसूल गावांचा समावेश असणाऱ्या काताळे ग्रामपंचायतच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गुहागर तालुका पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी काताळे ग्रामपंचायत प्रशासक सौ प्रियांका सुर्वे, पडवे ग्रामपंचायत प्रशासक मुजीब जा़भारकर, काताळे ग्रामपंचायत सदस्य जद भाटकर, नेत्रचिकित्सक नितिश शेट्ये, ओंकार कटक,श्रीधर रसाळ,तवसाळ ग्रामस्थ मंडळ माजी अध्यक्ष प्रदीप सुर्वे, काताळे बौद्धवाडीचे जेष्ठ ग्रामस्थ यशवंत पवार, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शंकर यद्रे, संदिप रसाळ,आरोग्य विभाग कर्मचारी योगेश गवारे,विशाल राठोड,शरद गडदे,ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व अशा सेविका,उपकेंद्र कर्मचारी यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ, शासकीय अधिकारी उपस्थित होते. या निःशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा 28 लाभार्थ्यानी लाभ घेतला. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे अशा शस्त्रक्रिया थोड्याच दिवसात डेरवण रुग्णालयामध्ये होणार असल्याचे नेत्र चिकित्सक श्री नितीश शेट्ये यांनी सांगितले. माझ गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत काताळे ग्रामपंचायत प्रशासक प्रियांका सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरा निमित्ताने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.