पं.आमोद दंडगे यांच्या हस्ते प्रख्यात निवेदक निबंध कानिटकर यांचा सन्मान

माखजन|वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील प्रख्यात निवेदक व सूत्रसंचालक श्री निबंध कानिटकर यांचा रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात पं.आमोद दंडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम येथील माधवरावं मुळये सभागृहात झाला.यावेळी संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.निवेदनातील त्यांच्या स्पृहणीय योगदानाबद्दल हा सन्मान झाला.आपल्या अवीट व मधुर वाणीने रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या निबंध कानिटकर यांची दखल घेण्यात आली.व त्यांच्या आदर्श निवेदन व सूत्रसंचालनाचं ज्येष्ठानी कौतुक केल.