डायबेटीस, थायरॉईड, सांधेदुखीसह अन्य व्याधीवर विशेष मार्गदर्शन, मोफत तपासणी
रत्नागिरी : रत्नागिरी येथील कारवांचीवाडी येथे डायबिटीज, थायरॉईड, सांधेदुखी पाठदुखीसह अन्य व्याधींवर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी फ्री मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आलं आहे.
डॉ. स्वप्ना संदीप करे यांच्या ‘ओम क्लिनिक’, निर्मल पॅराडाईज, कारवांचीवाडी रोड, रत्नागिरी येथे बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत हा फ्री मेडिकल कॅम्प होणार आहे. यामध्ये डायबिटीज, थायरॉईड, मासिक पाळी संबंधित तक्रारी, सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यावर विशेष मार्गदर्शन डॉ. स्वप्ना करे करणार आहेत.
त्याशिवाय मोफत बोन मिनरल डेन्सिटी म्हणजेच हाडांची मजबुतीची, ठिसूळपणाची तपासणी, मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला, मोफत ब्लड -शुगर आणि हिमोग्लोबिन तपासणी, एक्स-रे, लघवीच्या तपासणीवर 20% सूट अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अपॉइंटमेंटसाठी 8263878929 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी केले आहे.









