जन्मतः दोन्ही हात नसलेल्या माऊलीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदापर्यंत मजल…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील माऊली अडकुर यांनी आपल्या अपंगतावर मात करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अधिकारी या पदावर झेप घेतली.परिस्थिती कशीही असो जिद्द असेल तर आभाळ ही ठेंगणं वाटत! कोल्हापूरच्या माऊली अडकुर यांनी जन्मजात दोन्ही हात नसतानाही आपल्या अदम्य इच्छा शक्तीच्या जोरावर बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) सहाय्यक कार्यकारी अधिकारी पद मिळवून इतिहास रचला आहे.पायाने लिहित मानसशास्त्रात उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या माऊलीचा हा संघर्ष प्रवास अपयशाने खचणाऱ्या प्रत्येकासाठी मोठी प्रेरणा आहे.
दिव्यांग दत्तवामुळे खचून न जाता केवळ बुद्धिमत्ता, दुर्दम्य इच्छाशक्ती, परिश्रमांच्या बळावर यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते हे महाराष्ट्रातील एका धाडसी खाल्ल्याने सिद्ध केले आहे. तिने आपल्या शारीरिक कमतरतेलाच आपली सर्वात मोठी ताकद बनवून हे यश संपादन केले.

सध्या ती मुंबईत ‘असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ या प्रतिष्ठेच्या पदावर सेवा बजावत आहे.
माऊलीला जन्मत:च दोन्ही हात नव्हते. लहानपणापासून प्रत्येक साध्यासाध्या गोष्टीसाठी झगडणे तिच्या नशीबी होते. मात्र तिने कधीही स्वतःची दया केली नाही किंवा परिस्थितीला दोष दिला नाही. इतर मुले हातांनी जी कामे करत होती, ती कामे त्यांनी पायांच्या सहाय्याने करण्याचा सराव केला.

हळूहळू तिने लिहिणे, जेवणे, मोबाईल वापरणे, संगणक हाताळणे यांसारखी दैनंदिन कामे स्वतःच्या बळावर आत्मसात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण हार मानण्याऐवजी तिने त्या आव्हानांवर मात करण्याचा मार्ग निवडला.
शालेय जीवनात अनेकदा लोकांच्या कुतूहलपूर्ण नजरा आणि प्रश्नांना सामोरे जावे लागले. तरीही तिने शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही. पायांच्या सहाय्याने लेखन करत आपला अभ्यास पूर्ण केला. प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याची तिची धडपड सुरूच राहिली.

शारीरिक मर्यादा असल्या तरी मानसिक ताकद अधिक महत्त्वाची असते, हा संदेश माऊलीच्या प्रवासातून आपल्याला मिळतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
मात्र तिच्या स्वप्न एवढ्यावरच मराठीत नसून मुख्य प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. हे ध्येय गाठण्यासाठी ती सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेची अत्यंत जोमात तयारी करत आहे.