“सभापती दिव्यांगांच्या दारी” सिद्धेश रावराणे यांची सामाजिक बांधिलकी

14 दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप : पालकांकडून उपक्रमाचे कौतुक

वैभववाडी प्रतिनिधी :
तालुक्यातील 14 दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांनी ‘सभापती दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबवत शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या थेट घरपोच केले. सभापती श्री रावराणे यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी आभार व्यक्त केले.

पालकमंत्री नितेश नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांग विदयार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, श्री चव्हाण सर, श्री तापेकर सर उपस्थित होते. कु.तन्मय मनिष रावराणे, आचिर्णे, आर्यन म्हांबू कोकरे कुर्ली, कु.दक्षता सुनील मोहीते, खाबाळे मोहीतेवाडी, सुमित विजय फाळके एडगाव, रिदय राहूल जाधव सांगुळवाडी, वेद सुभाष पवार खांबाळे मधलीवाडी, श्रावणी मंगेश मांजलकर लोरे हेळेवाडी, आरोही समीर कुलकर्णी, वैभववाडी या विदयार्थ्यांच्या घरी जाऊन मा.महोदयांनी साहित्य वितरित केले.