पावणादेवीवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात पालक सन्मान सोहळा
कणकवली: फोंडाघाट पावणादेवीवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि मराठी शाळा पुनर्जीवित करण्यासाठी आपल्या पावणादेवी येथील मराठी शाळेमध्ये आपल्या पाल्यास ज्यांनी दाखल केले आहे अशा पालकांचा पालक सन्मान सोहळा हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल रखुमाई मंदिर न्यास चे अध्यक्ष कमलाकर गोविंद महाजन, उपाध्यक्ष किशोर जनार्दन केळुस्कर ,सेक्रेटरी कौस्तुभ रेडकर,खजिनदार सुनील पंढरीनाथ तारळेकर ,तसेच सल्लागार शशिकांत ठाकूर गुरुजी उपस्थित होते.
मराठी शाळेमध्ये बालकाचा सर्वांगीण विकास होतो. इतर जिल्ह्यांनी जे उपक्रम मराठी शाळांचा पट वाढवण्यासाठी आणि मराठी शाळा बंद होण्यापासून वाचण्यासाठी जे उपक्रम राबवले आहेत, उदाहरणार्थ कर माफ करणे, घरपट्टी माफ करणे असे उपक्रम आपण देखील ग्रामपंचायत च्या देखरेखीखाली राबवले पाहिजेत असे मत विठ्ठल रखुमाई मंदिर न्यास चे सल्लागार श्री शशिकांत ठाकूर यांनी व्यक्त केले.तसेच अध्यक्ष श्री कमलाकर महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री होळकर गुरुजी, नंदकुमार ठाकूर, गजानन तावडे , स्वप्निल गवळी, प्रथमेश महाजन यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कौस्तुभ रेडकर यांनी केले आणि आभार श्री सुनील तारळेकर यांनी मानले.










