अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत एसपीएम परशुराम येथील शाळेचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक

जिल्हा स्तरावरील स्पर्धेत निवड 

चिपळूण : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक ) रत्नागिरी पंचायत समिती चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ ,चिपळूण यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित दिनांक १२ ऑगस्ट २०२३, रोजी चिपळूण तालुकास्तरीय ‘ अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२३ – २४’ शि.प्र. मंडळी संचलित एसपी एम सीबीएसई मान्यता प्राप्त परशुराम’ येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाला.

या मेळाव्यातील पहिला टप्पा तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेने यशस्वीरित्या पार पडला.
या स्पर्धेमध्ये एकूण २८ शाळांचे २८ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचा विषय ‘Millet-a superfood or a diet fad’ ( भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम ) असा होता.
विज्ञान मेळाव्याचे, वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन विस्तार अधिकारी श्री. राज देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले याप्रसंगी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. एम के पाटील, एसपीएम परशुराम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती खाडीलकर मॅडम, तालुका विज्ञान मंडळाची कार्यकारिणी उपस्थित होती.
प्रथम या सर्व स्पर्धकांची २० गुणांची ‘ भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भम्र ‘ या विषयावर आधारित लेखी चाचणी घेण्यात आली तदनंतर प्रत्येक विद्यार्थ्याने या विषयाला अनुसरून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या आधारे सादरीकरण केले.
या स्पर्धेत यशस्वी झालेल्या पहिल्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यांना उपस्थितांकडून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
एसपीएम सीबीएसई मान्यता प्राप्त परशुराम शाळेने स्पर्धेच्या यजमानपदाचा मिळालेला बहुमान , स्पर्धेचे उत्तम आयोजन करून सार्थ ठरविला.
या स्पर्धेत एसपीएम परशुराम शाळेने तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत एस्. पी .एम्, शाळेने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर स्पर्धेत सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.
या स्पर्धेसाठी शाळेतील कुमारी अंतरा गणेश भोबेकर. (इयत्ता ९ वी )या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती .शाळेतील विज्ञान या विषयाचे शिक्षक : श्री अनिल शृंगारे सर, सौ. कविता घाग , सौ. प्राजक्ता कडू आणि सौ. स्नेहल जोशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने व विषयाला अनुसरून असेलेले पाँवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करुन कु : अंतरा गणेश भोबेकर या विद्यार्थ्यांनीने हे यश प्राप्त केलेले आहे.
या मिळालेल्या यशाबद्दल शि.प्र. मंडळीच्या संस्था चालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आरती खाडीलकर मॅडम व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुढील विभागीय स्तरावर यश प्राप्तीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.