वेंगुर्ले : प्रतिनिधी : आडेली येथील जीवन कुडाळकर यांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस अधीकारी व अन्य दोन पोलीसांच्या भ्रष्टाचारी गैरप्रकारा विरूध्द भिक मांगो जनजागृर्ती आंदोलन आज पासून आडेली येथून सुरू केले आहे. त्याला ग्रामस्थांचाही पाठिंबा मिळत आहे.
या आंदोलना विषयी जिवन कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की माझे आंदोलन दि .१४ आॅगष्ट २०२३ रोजी ठरल्या प्रमाणे मी सुरु केले आहे पण त्यात मी थोडा बदल केला आहे. कारण जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यानी दिलेले मनाई आदेश लक्षात घेता त्या आदेशांची पायमल्ली होणर नाही याची काळजी घेत आहे. कारण माझे आंदोलन हे भ्रष्ट बनलेल्या त्या तीन पोलांसाच्या विरोधात आहे, समस्त पोलिस खात्या विरोधात नाही.












