आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती
लांजा (प्रतिनिधी) :लांजा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावणारे केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा नुकताच लांजा शाळा क्रमांक ५ येथे पार पडला.
या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी शिक्षण सभापती नंदा मुरकर, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, लीला घडशी, मनिषा लाखण, पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री, दिपाली दळवी, साक्षी चव्हाण, , व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रांजली कुरूप, गटविकास अधिकारी श्री. गिरी,गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, मुन्ना खामकर, विस्तार अधिकारी श्री. कडवसर आदी उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त झालेले विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर, विस्तार अधिकारी समृद्धी खडपे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सुहास आयरे , भिकाजी रावले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करताना अनेक पिढ्या घडविण्याचे महान कार्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती करतात. आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजासाठी पुढेही होत राहावा,” असे मत आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, शिक्षकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
या सत्कार सोहळ्यास शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनीही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












