खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील अपेडे येथील कदम फाउंडेशनच्या वतीने आंबवली बीटातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली येथे सोमवारी (दि. २२ जून) आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दप्तर, मिल्टन पाण्याच्या बाटल्या, वह्या, चित्रकला वही, रंगीत तेलखडू बॉक्स, पाऊच तसेच कंपास बॉक्समधील साहित्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला कदम फाउंडेशनचे अध्यक्ष गणपत कदम, उपाध्यक्षा संगीता कदम तसेच सदस्य रवींद्र कदम, प्रवीण कदम, रेणुका कदम, कविता कदम, सुभाष म्हापार्ले, कुमार मितांश कदम यांच्यासह फाउंडेशनचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी वरवली केंद्राचे केंद्रप्रमुख नलावडे, वरवली केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच आंबवली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्षा सिद्धी यादव, समिती सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात रेणुका कदम यांनी विद्यार्थ्यांना कदम फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवाळे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन साळवी सर यांनी केले.
सौ. सारिका कदम यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. आंबवली बीटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न केल्याबद्दल कदम फाउंडेशनचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.













