हॉटेल पायसदान ची कंपाउंड वॉल कोसळून लाखोंचे नुकसान
दापोली(प्रतिनिधी):
एल निनो च्या प्रभावामुळे लांबलेल्या मौसमी पावसाने मुसळधार बॅटिंग काल रात्रीपासून सुरू केली .या पहिल्याच पावसाचा दणक्यामध्ये दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील रमेश भुवड यांच्या हॉटेल पायसदानची कंपाउंड वॉल आज सकाळी कोसळली आहे.
रमेश भुवड यांनी दिलेला माहितीनुसार सुमारे साठ फूट लांबीची पक्की चिरे बांधकाम असलेली कंपाउंड वॉल ही रस्त्यालगत असून काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या दाबामुळे कोसळल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला . यामुळे लाखो रुपयांचे नुकसान भुवड यांचे झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. .
दापोली चंद्रनगर या मुख्य रस्त्यावर असलेल्या पायसदान ची कंपाउंड वॉल कोसळल्यामुळे वाहतूकदारांनी या ठिकाणाहून जाताना सावधानता बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे .या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये याकरिता रमेश भुवड यांनी रस्त्याच्या बाजूने चिरे लावून ठेवले आहेत.
सदर घटनेची माहिती चंद्रनगर चे प्रशासक सकपाळ यांना दिली असल्याची माहिती भुवड यांनी दिली आहे.













