केंद्र शाळा साळशी शाळेला शैक्षणिक साहित्याची भेट

कै. अनुसया विठोबा परब यांच्या स्मरणार्थ उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) : कै. अनुसया विठोबा परब यांच्या स्मरणार्थ अनिल परब व प्राजक्ता परब यांनी केंद्र शाळा साळशी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देत सामाजिक बांधिलकी जपली.

शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया असल्याने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी अनिल परब व प्राजक्ता परब यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गावकर, केंद्रप्रमुख सुनील कोदले, केंद्र मुख्याध्यापक प्रकाश झाडे, पदवीधर शिक्षक ज्ञानोबा हाके, उपक्रमशील शिक्षिका स्मिता कोदले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.