पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे येथे वृक्षारोपण

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. वागदेचे सरपंच संदीप सावंत यांच्या पुढाकारातून मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे सहा किलोमीटर परिसरात प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले.

 

या उपक्रमाचा शुभारंभ शितल दळवी, अक्षता राणे, नीलम पालव आणि संजना गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी वागदेचे सरपंच संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, बूथ प्रमुख लक्ष्मण घाडीगावकर, भाई काणेकर, सुनील ताटे, संजय घाडीगावकर, महेश सरंगले, अमित दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

याप्रसंगी सरपंच संदीप सावंत यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात ग्रामपंचायत हद्दीमध्ये सावलीसाठी उपयुक्त आणि पर्यावरणपूरक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि हरित ग्रामपंचायत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.