पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक राकेश राणे यांच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सुविधेसाठी टेबल फॅन भेट देण्यात आले. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना उष्णतेच्या वातावरणात दिलासा मिळावा आणि त्यांची गैरसोय टाळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अण्णा उर्फ सुरेंद्र कोदे, नगरसेवक संजय कामतेकर, माजी नगरसेवक रवींद्र गायकवाड, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे, औदुंबर राणे, पंकज पेडणेकर, महेश सावंत, चारुदत्त साटम, अभय राणे, प्रशांत सावंत, मिथुन ठाणेकर, शिवसुंदर देसाई तसेच बाळा पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून रुग्णालयाला टेबल फॅन भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा संदेशही देण्यात आला.












