पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने तुळसुली येथे गोसेवा

८५ भाकड गाईंच्या संगोपनासाठी भाजपाकडून आर्थिक सहाय्य

स्वप्निल कदम -कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी यंदाचा वाढदिवस गोसेवा करून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ मंडलच्या वतीने तुळसुली येथील श्रीकृष्ण आनंदवन गोशाळेत गोसेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी गोशाळेतील ८५ भाकड गाईंच्या चारा व संगोपनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत श्रीकृष्ण गोशाळेचे संचालक आनंद वारंग व त्यांच्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बंडया सावंत, सौ. संध्या तेरसे , ज्येष्ठ नेते राजू राऊळ, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्षा आरती पाटील, मंडल उपाध्यक्ष राजा धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्या आदिती सावंत, श्रीपाद तवटे, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, मंडल उपाध्यक्ष विजय वारंग, माजी सभापती प्रतिभा घावणळकर, पंचायत समिती सदस्या अर्चना घावणळकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी गोशाळेचे संचालक आनंद वारंग यांनी उपस्थितांचे आभार मानले व पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गोसेवेच्या माध्यमातून समाजात संवेदनशीलता व पशुप्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.