ओटवणे (प्रतिनिधी ) राज्याचे मस्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्यावतीने ओटवणे येथील चारही शाळांच्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कंपास पेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य उत्कर्षां गावकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख तथा ग्रा. सदस्य प्रशांत बुराण, विश्वनाथ बोर्ये, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर आदी मान्यवर हजर होते. यावेळी चारही शाळांच्या शिक्षकवृंदां कडून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शाळेतील विधार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्त सामाजिक भान राखत कंपास पेटीचे वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचेही आभार मानले व त्यांच्याही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्हाभर साजरा होत असताना माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातही विक्रांत सावंत आणि मित्रमंडळ यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला.
Home ताज्या घडामोडी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांच्याकडून...












