पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भाजप शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर यांच्या प्रेरणेने मत्स्य व्यवसाय,बंदरे विकास मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री मा.नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे भाजप रेडी जिल्हा परिषदवतीने रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,वेंगुर्ला तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी,शिरोडा,आरवली,रेडी शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे मयूरेश शिरोडकर, महादेव नाईक, जगन्नाथ राणे,गजानन बांदेकर,शिरोडा शहर भाजप अध्यक्ष अमित गावडे,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा बूथ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर,भाजप शिरोडा पदाधिकारी बाबल गावडे, प्राजेश गावडे,शिरोडा भाजप युवा नेतृत्व संतोष धानजी, आरवली बूथ अध्यक्ष मिलिंद साळगांवकर,भोमवाडी भाजप हिंतचिंतक प्रकाश वराडकर, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय डाॅक्टर प्रदीप शेटकर उपस्थित होते.