कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ – सांगवे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत नाटळ – सांगवे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये संदेश ऊर्फ गोट्या सावंत व संजना संदेश सावंत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नाटळ-सांगवे विभागीय कार्यालय आणि कनेडी बाजारपेठ येथे नागरिकांना जिलेबी व वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश ढवळ, पंचायत समिती सदस्या राजश्री पवार, माजी शिक्षण विस्तार अधिकारी तथा सांगवे सरपंच संजय सावंत, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, दिगवळे सरपंच संतोष गावकर, दारिस्ते सरपंच सानिका गावकर, प्रफुल्ल काणेकर, राजेश सापळे, अनंत शिरसाठ, मदन बागवे, मिनल पवार, अंजली शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.












