साखरपा वार्ताहर:
संगमेश्वर तालुक्यातील कळकदरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून दुपदरी करण्यासाठी खोदलेल्या व सध्या पर्यायी असलेला रस्ता धोक्याचा बनला आहे. निनावे ते ओझरे बु.यामधील काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी बांधलेल्या मोऱ्यांजवळचा रस्ता वाहून गेला आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची ही दयनीय अवस्था झाली आहे तर पुढील पावसात काय होणार. वाहनधारक वाहने चालविण्यास घाबरत आहेत.याकडे संबंधित यंत्रणा लक्ष का देत नाही. जिवित हानी झाल्यावरच संबंधित यंत्रणेला जाग येईल का, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. रस्त्यामुळे एस.टी.वाहतूक बंद झाली तर त्याला जबाबदार कोण. शालेय विद्यार्थी, व्यसयासाठी दररोज येणारे नागरिक, रुग्ण यांची बिकट अवस्था होणार असून संबंधित यंत्रनेने यावर त्वरित उपाय योजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Home महत्वाच्या बातम्या पहिल्याच पावसात ओझरे रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्याला तडे गेल्याने मार्ग बंद पडण्याची...












