प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणीचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

​रत्नागिरी:- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिला जाणारा मानाचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पात्र बालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.
​या पुरस्काराबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
​पुरस्कारासाठीची पात्रता व निकष:
​वयोमर्यादा: बालकाचे वय ५ वर्षांपेक्षा अधिक आणि ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
​क्षेत्र: ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध (Innovation), सामाजिक कार्य आणि शौर्य (Bravery) अशा विविध क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण किंवा उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशी बालके या पुरस्कारासाठी पात्र असतील.
​अर्ज करण्याची पद्धत:
​या पुरस्कारासाठीचे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
​सार्वजनिकरित्या खुले नामनिर्देशन (Open Nomination) करण्यासाठी इच्छुकांनी http://awards.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले प्रस्ताव सादर करावेत.
​अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
​जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व गुणी बालकांनी तसेच त्यांच्या पालकांनी किंवा संस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ऑनलाईन पद्धतीने नामांकन दाखल करावे. अधिक माहिती व सविस्तर तपशिलासाठी http://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.