दोडामार्गला त्या १२ हत्तींचा धोका टळला, हत्ती कर्नाटक दाडेली मार्गांवर,

सहाय्यक वनसंरक्षक यांची माहिती

​दोडामार्ग:सुहास देसाई

दोडामार्ग तालुक्यात आधीच ६ हत्तींनी धुमाकूळ घातलेला असताना आता कर्नाटक सीमाभागात तब्बल १२ हत्तींचा मोठा कळप दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. हे हत्ती कर्नाटक जांबोटी हुन बांदेकर वाडीतून पुन्हा आपल्या भागात वळले आहे या भागात नुकतीच दोडामार्ग वनविभागाचे पथक तातडीने ड्रोन कॅमेऱ्यासह कर्नाटक सीमेवर दाखल झाले आहे.त्यामुळे वन विभाग अलर्ट असून तालुक्यातील हत्ती येणार हे वृत्त फेटाळले असून ते कर्नाटक दाडेलीच्या दिशेने पुनःश्च गेल्याने हत्ती दुसरे संकट ठळले आहे अशी माहिती वन विभागाचे सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी दिली आहे

​दोडामार्ग तालुक्याच्या घाट माथ्यावरील सीमेवर १२ हत्तींचा कळप असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासून रंगली होती. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी दोडामार्ग वनविभागाची टीम बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे पोहोचली. यावेळी कणकुंबी वनविभागाने स्पष्ट केले की, १२ हत्तींचा जांबोटी पंचक्रोशीत वावर होता ते हत्ती पुढे गेले आहे

कर्नाटक ​वनविभागाच्या पथकाने कणकुंबी आणि जांबोटी परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हत्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिवसाची वेळ असल्याने आणि घनदाट वनराईमुळे हत्ती नजरेस पडले नाहीत. स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली असता, हा कळप रविवारी जांबोटी परिसरात दिसला होता, अशी माहिती समोर आली आहे.

​सध्या दोडामार्ग तालुक्यात असलेल्या ६ हत्तींनी आधीच बागायतींचे अतोनात नुकसान केले आहे. अशातच सीमेवर असलेल्या १२ हत्तींच्या कळपाने जर दोडामार्गची वाट धरली, तर ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हे हत्ती सध्या दांडेलीच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रवासादरम्यान हा कळप विभक्त होऊन काही हत्ती दोडामार्गमध्ये शिरण्याची शक्यता होती ती धूसर झाली आहे

​ दोडामार्ग वनविभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये

हत्तींची माहिती मिळताच दोडामार्ग वनविभागाची टीम बुधवारी दुपारीच कणकुंबी येथे रवाना झाली होती. सीमेवर हत्तींचा वावर असल्याने वनविभागाने गस्त वाढवली असून, सीमाभागातील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अशी माहिती देण्यात आली