एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ९७% टक्के निकालांची उज्वल परंपरा; कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चे विद्यार्थी चमकले

 

कणकवली, २५ जून २०२६ येथील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्ष (बी.ई. २०२५-२६) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,संगणक विभागा तून आठव्या अंतिम सत्रासाठी ५८ विद्यार्थी उपस्थित राहिले व ५८ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन संगणक विभागाचा निकाल ९७% टक्के लागला आहे. या परीक्षेत विभागात प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून अनुक्रमे कु. साहिल आवटे यांनी ९.५१ सीजीपीआय (प्रथम क्रमांक), कु. जेसिया फर्नांडिस ९.३० सीजीपीआय (द्वितीय क्रमांक) आणि कु. समृद्धी ढोके ९.०४ सीजीपीआय (तृतीय क्रमांक) मिळवून यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि स्वतःच्या परिश्रमांना दिले आहे.

या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस बाडकर,आणि संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. स्वप्नील कदम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. “विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे. महाविद्यालयाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले असून, या निकालाने पुन्हा एकदा ते सिद्ध झाले आहे,” अशा शब्दांत प्राचार्य डॉ. बाडकर, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपले मत व्यक्त करताना,विभागप्रमुख प्रा. स्वप्नील कदम म्हणाले, “आमच्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यावर आमचा भर असतो आणि त्याचे सकारात्मक परिणाम या निकालातून दिसत आहेत.”

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्षा सौ निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, व प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर, सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांवर महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या उज्ज्वल भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.