सावरकर नाट्यगृह समोरील हॉटेल बाहेर उभ्या दुचाकीच्या डिकीतले 20 हजार रुपये गेले चोरीला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील सावरकर नाट्यगृह समोरील हॉटेल बाहेर उभी केलेली दुचाकीच्या डिकीतले 20 हजार रुपये अज्ञाताने लांबवले.ही घटना शनिवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते 12 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत मोहम्मद शाहिर इशामुददीन मस्तान (36,रा.रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी सकाळी त्याने आपली दुचाकी (एमएच-08-एबी-0103) सावरकर नाट्यगृहा समोरील हॅशटॅग हॉटेलच्या समोर उभी केली होती.अज्ञाताने या दुचाकीच्या डिकीमधून रोख 19 हजार 500 रुपये चोरुन नेले.काही वेळाने मोहम्मद मस्तान दुचाकीजवळ गेला असता त्याला दुचाकीमधील रोख रक्कम चोरी गेल्याचे लक्षात आले.त्याने तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.