भाजपने कणकवलीत दुचाकी रॅलीतून जागवली देशभक्ती…!
स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला कणकवली शहरातून काढली मोटारसायकल रॅली…!
कणकवली ;
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातून भाजपने दुचाकी रॅली काढली. रॅलीदरम्यान’वंदे मातरम्’, ‘भारत माता जी जय’ अशी घोषणाबाजी करत दुचाकीला तिरंगा फडकवत कार्यकर्त्यांनी वातावरण देशभक्तीमय केले.
दुचाकी रॅलीचा शुभारंभ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी गोट्या सावंत, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत,अण्णा कोदे, संदीप मेस्त्री,संदीप सावंत जाणवली, गणेश तळगावकर,समीर प्रभुगावकर,स्वप्नील चिंदरकर, आनंद घाडी, सुभा मालंडकर,प्रज्वल वर्डम,संकेत राणे,काका गोमने,सचिन साळवी,मिलिंद चिंदरकर, अनंत तानवडे,सचिन पारधीये,अरुण दळवी,सागर राणे,इब्राहिम शेख,राजू नार्वेकर, प्रशांत सावंत,प्रशांत राणे,भाई सावंत, राजू मोडक, संतोष कदम,सचिन खेडेकर, राजू पाटकर, सिद्धार्थ जाधव,नयन दळवी,नितीन राणे,आबा कोरगावकर, लवू परब,प्रदीप गावडे,स्वप्नील गोसावी,प्रवीण दळवी,राज नलावडे,अभय गावकर,ऋत्विक नलावडे, आदी उपस्थित होते
रॅलीदरम्यान प्रत्येकाने दुचाकीस्वाराने भारताचा झेंडा लावला होता. हे चित्र सर्वांचे लक्षवेधून घेत होते. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता जी जय’ यासह अन्य देशभक्ती जागृत करणाऱ्या घोषणात देत वातावरण देशभक्तीमय केले. ही रॅली अप्पासाहेब पटवर्धन चौक बाजारपेठ मार्गे पटकीदेवी, शिवाजीनगर मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. त्यानंतर रॅलीची सांगता झाली.
फोटो – स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला भाजपने शहरातून काढली मोटारसायकल रॅली (छाया – अनिकेत उचले)












