पावसाची गंमत ऐका बालजगतमध्ये पाऊसगाण्यांमधून..

28 जून रोजी प्रसारण

रत्नागिरी –
दरवर्षी सगळ्यांना वाट बघायला लावणारा पाऊस आपली वेगवेगळी रूप दाखवत असतो. हीच पावसाची गंमत ऐकायला मिळणार आहे पाऊस गाणी या कार्यक्रमामधून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
बाल जगत या लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात 28 जून रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी पाऊस गाणी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील छोटे गायक कलाकार रुद्राणी मुळ्ये,त्रिशा पेंडसे,कपिश माईणकर, कौशिकी रानडे, इरा भाटवडेकर, कौशिकी नवाथे आणि सावनी सरपोतदार यांनी ही पाऊसगाणी गायली आहेत.

त्यांना हार्मोनियमसाथ ओजस करकरे, तबलासाथ स्वरूप नेने, इतर तालवाद्य स्वराज्ञी सरपोतदार, सूत्रनिवेदन सावनी सरपोतदार आणि या छोट्या गायक कलाकारांना संध्या सुर्वे यांनी मार्गदर्शन केलं आहे. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत यांचं असून सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत.
1143 Khz मध्यमलहरी, 101.5 Mhz एफ. एम. वाहिनी, Newsonair मोबाईल अँपवर या कार्यक्रमाचं प्रसारण थेट ऐकू येईल. लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा बाल जगत हा कार्यक्रम अवश्य ऐकावा असं आवाहन करण्यात आले आहे.