जिल्हा संपर्क नेत्यांची उपस्थिती, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दौरा
लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क नेते रत्नागिरी दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २८ व २९ जून रोजी जिल्हा आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई , शिरीष सावंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनविसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनीष पाथरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
रविवार दिनांक २८ जुन रोजी सकाळी ९ वाजता अपरान्त हॉलिडे होम, देवरुख येथे संगमेश्वर तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार असून १० वाजता राजापूर येथील शासकीय विश्रामगृह सभागृहामध्ये लांजा आणि राजापूर तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सायंकाळी ठिक ४.३० वाजता रत्नागिरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्राम गृह सभागृह, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
सोमवार, दिनांक २९ जुन रोजी सकाळी १०.०० वाजता गुहागर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक राजगड, हेमंत हॉटेल, शृंगारतळी येथे होणार असून चिपळूण व खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी १२.०० वाजता हॉटेल, चिपळूण येथे होणार आहे. दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी ४.०० वाजता दापोली येथे मधू मालती निवास गिम्हवणे संतोष शिर्के निवासस्थानी पार पडणार आहे.
मुंबई स्थित रत्नागिरीवासिय महाराष्ट्र सैनिकांना या बैठकांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी या सर्व बैठकांना त्या त्या तालुक्यातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटना यांचे आजी व माजी महिला व पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













