लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने रविवारी २८ जून रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अजिंक्य मंगल कार्यालय लांजा येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आयोजित या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला मुंबई येथील उद्योजक सुबोध सरफरे , उद्योजक राजेंद्र लोटणकर, उद्योजक प्रसाद पाटोळे, उद्योजक विकास पाटोळे , लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ सावली कुरूप हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे व सर्व कार्यकारी पदाधिकारी यांनी केले आहे.