दापोली(प्रतिनिधी) :
दापोली-खेड मार्गावरील नवानगर परिसरात आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. यात दीड वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एका वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना अंदाज चुकल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.
अपघातानंतर जवळपास दोन तासांनी घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची संख्या याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मारुती आणि होंडा कंपनीच्या दोन चार चाकी गाड्यांचा हा भीषण अपघात झालाय. आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्या च्या दरम्यान घडलेल्या या अपघातामध्ये एक दीड वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान ओव्हर टेक करताना मारुती कंपनीची गाडी नंबर MH 04 D Y6863 या गाडी चालकाला अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या गाडी नंबर MH 12 K J1027 या होंडा कंपनीच्या गाडीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला.
दरम्यान या अपघातामुळे मार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांची वाहतूक जवळपास दीड तासापासुन खोळंबून राहिली होती. नुकतेच घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत. जखमीना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यामध्ये एक दीड वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.अजून पोलीस स्टेशनला नोंद नाही पंचनामा सुरु आहे.











