बालवयात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार देणे महत्त्वाचे- दत्ता सामंत

चौके हायस्कूल येथे शालेय मुलांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम संपन्न

चौके प्रतिनिधी :-मुलांच्या विद्यार्थी दशेमध्ये त्यांना शिक्षणासोबतच संस्कार मिळणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे त्याच्या जीवनाची दिशा ठरवितात. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांनी केले. मालवण तालुक्यातील भ.ता.चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता सामंत यांनी आपले विचार मांडले.

ग्रामीण भागातील मुलांना 100 सायकल देणार

याचवेळी ग्रामीण भागातील येणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर सायकलींची सोय आपल्या मार्फत केली जाईल.त्याचप्रमाणे शाळेच्या शैक्षणिक विकास साठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही या प्रसंगी दत्ता सामंत यांनी दिली.
संस्थेच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सचिव श्री संतोष धुरी यांनी संस्थेच्या व शाळेच्या वाटचालीबाबत सर्वांना माहिती दिली.तसेच येणाऱ्या वर्षात शैक्षणिक उपक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जयराम परब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याच वेळी गुरुवर्य श्री पां काकतकर ट्रस्ट यामार्फत सुद्धा विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा आदर्श माता पिता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर श्री दत्ता सामंत, संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जयराम परब, स्थानिक समिती अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे,उपाध्यक्ष श्री अनिल सुकाळी, स्थानिक समिती सल्लागार श्री मंगेश चव्हाण, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्याम मेस्त्री, श्री सदा गावडे गुरुजी, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष सुरेश चौकेकर, स्थानिक समिती सदस्य कमलाकर गावडे, नरेश चव्हाण, किशोर वाक्कर, आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर, नांदरुख चे सरपंच रामचंद्र चव्हाण,साळेल सरपंच श्री रवींद्र साळकर आंबडोस गावच्या सरपंच सौ सुबोधिनी परब, आंबेरी पोलीस पाटील श्री खोत, श्री काळसेकर डॉक्टर, पत्रकार श्री नितीन गावडे,वावळ्याचे भरड मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता गावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रसिका गोसावी मॅडम आदी उपस्थित होते.

यावेळी संघर्ष महिला बचत गट चौके यामार्फत सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी श्री विजेंद्र गावडे त्याचप्रमाणे सुबोधिनी परब यांनी सुद्धा आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री प्रसाद परुळेकर यांनी मांडले.