श्री सूर्यनारायणाचा मूर्ती प्रतिष्ठापानेचा वर्धापन दिन साजरा

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावातील श्री सूर्यनारायण मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदीशीला दरवर्षी मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन साजरा होतो.
यादिवशी सकाळी मूर्तीवर अभिषेक,सौर लघुरुद्र,आरती मंत्रपुष्प,दुपारी महाप्रसाद झाला. सायंकाळी कीर्तन असा उत्सव साजरा झाला.कीर्तनकार म्हणून पुण्याचे कीर्तनकार ह.भ.प.गोखले बुवा उपस्थित होते.यावेळी तबला सुरज पाटणकर,व हार्मोनियम ला साथ आनंद लिंगायत यांनी केली.
उत्सवाला उपस्थित ग्रामस्थ,भाविकांचे आभार अध्यक्ष अशोक पोंक्षे,सचिव सतीश पोंक्षे यांनी मानले.