तहसील कार्यालय मालवण येथे भारतीय स्वातंत्र्य दिन वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न…

 

तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मालवण : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ व्या वर्धापन दिन…. मालवण तालुका शासकीय ध्वजारोहण मुख्य सोहळा मालवण तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या हस्ते संपन्न झाला.

मालवण पोलीस दल, गृहरक्षक दल, सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभाग, शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील, व्यापारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, लायन्स क्लब, रोटरी क्लब यासह अन्य सामाजिक संस्था, विद्यार्थी व नागरिक यावेळी उपस्थित होते.