अध्यक्षपदी गौतम कांबळे, तर सचिव पदी विनोद बेनकर यांची निवड
लांजा( प्रतिनिधी) :गेल्या काही वर्षांपासून सांस्कृतिक,
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कृती फाउंडेशन, लांजा या संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी
गौतम कांबळे तर सचिव पदी विनोद बेनकर यांची निवड करण्यात आली आहे.
संस्कृती फाउंडेशन ची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये संस्थेची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष पदी संतोष म्हेत्रे, जिल्हा संपर्क प्रमुख – सिद्धेश पांचाळ, सहसंपर्क प्रमुख – श्रीकांत बोंबळे, संघटक म्हणून प्रियवंदा जेधे, संघटक योगेश शेट्ये यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून दिनेश बेनकर (मुंबई) व प्रवीण कांबळे (रत्नागिरी), स्पर्धा प्रमुख – अरबाज नेवरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सदस्य म्हणून प्रकाश पांचाळ, अभिजित गोसावी, अभिषेक गांधी, अभिषेक गांधी , रुपेश पांचाळ, अभय पाध्ये, अभिषेक उपशेटये,ऋतुजा गोसावी, ॲड. शिवानी गोडबोले, विशेष निमंत्रित सदस्य – ओंकार आचरेकर, नंदकिशोर जुवेकर, तर कायदेविषयक सल्लागार – ॲड. सुमंत वाघदरे व ॲड. नितीन गोडबोले यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.













