पडवे, सिंधुदुर्ग :एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग येथे आज राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्यरत राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेला मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी वरिष्ठ अधिकारी डॉ. आर. एस. कुलकर्णी, डीन डॉ. वंदना गावपांडे, हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. आशुतोष पोदार तसेच हॉस्पिटल इन्चार्ज डॉ. हेमंत भारती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी सर्जरी विभागाचे डॉ. पांडुरंग वज्राटकर, जनरल मेडिसिन विभागाचे डॉ. संजीव आकेरकर, किडनी विकार विभागाचे डॉ. प्रकाश घोगळे, मेंदू विकार विभागाचे डॉ. मुकुंद अंबापूरकर, स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या डॉ. मृदुला महाबळ, डॉ. विशाल पाटील, कान-नाक-घसा विभागाच्या डॉ. मिनल सलामे, डॉ. जीरोनिमो डिसोझा, नेत्ररोग विभागाच्या डॉ. क्रांती शिरसागर, ऑर्थोपेडिक विभागाचे डॉ. अंजने करंगुटकर, भूल व क्रिटिकल केअर विभागाच्या डॉ. सुरभी कशाळकर, बालरोग विभागाच्या डॉ. पूनम रायकर, दंत विभागाच्या डॉ. प्राची भेके, मानसोपचार विभागाचे डॉ. रघुवेंद्र पाटील, तसेच Emergency Medical Officers (EMO), Resident Medical Officers (RMO) आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवाभाव, रुग्णांप्रती असलेली बांधिलकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरांना शुभेच्छा देत, समाजाच्या निरोगी भविष्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले.
यावेळी प्रेरणादायी संदेश देताना सांगण्यात आले की, “डॉक्टर हे केवळ उपचार करणारे तज्ज्ञ नसून, ते प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यात आशा, विश्वास आणि नवजीवन निर्माण करणारे खरे जीवनदाते आहेत. पांढरा कोट हा केवळ एक पोशाख नसून, तो समर्पण, करुणा आणि मानवसेवेची सर्वोच्च ओळख आहे. डॉक्टरांचे ज्ञान, सेवाभाव आणि त्याग यामुळेच समाज अधिक निरोगी, सक्षम आणि सुरक्षित बनतो.”
याप्रसंगी मा. खासदार नारायणराव राणे साहेब तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम नारायणराव राणे वहिनीसाहेब यांनी सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप सर्व डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आणि रुग्णसेवेची ही अखंड परंपरा अधिक जोमाने सुरू राहो, या सदिच्छांसह करण्यात आला.













