बिळवस सातेरी जलमंदिर रस्त्यावरील अडथळे दूर !

​मसुरे | झुंजार पेडणेकर
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बिळवस-कुंभळ-सातेरी जलमंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड वाहून आले होते. यामुळे हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे असुरक्षित बनला होता आणि येथील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाची वाट न पाहता बिळवस येथील ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत मोकळा केला आहे.

​रस्त्यावरील या अडथळ्यांमुळे बिळवस गावात येणारी ‘एस.टी.’ बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय ओळखून ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावर साचलेली माती आणि मोठे धोंडे बाजूला केले.यावेळी
​संतोष दि. पालव,
​आनंद पालव,​शार्दुल पालव, ​गणेश पालव,
​आपु पालव, ​पपु पालव,
​आपा पालव,​बाबी पालव,​लक्ष्मण पालव,
​अरविंद पालव, ​पालव सर, ​विलास पालव,
​दाजी गावडे, ​गणेश पालव, ​मनोज पां. पालव आदी उपस्थित होते. ​या सर्व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे रस्त्यावरील सर्व अडथळे यशस्वीरित्या दूर करण्यात आले असून रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे योग्य झाला आहे.

​रस्ता दुरुस्त झाल्यामुळे बिळवस परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्याअभावी बंद असलेली बिळवस गावाची ‘एस.टी.’ बस सेवा उद्यापासून पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती संतोष पालव यानी दिली.