भाजपा किसान मोर्चा तर्फे आरवलीतील प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांचा सत्कार

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांना शेतकरी फेलो पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा भाजप किसान मोर्चा तर्फे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे मोदी सरकारच्या बारा वर्षेपूर्ती निमित्त ‘नैसर्गिक शेती संमेलन’ आयोजीत केले होते. या संमेलनात उत्कृष्ट कार्य आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, किसान मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तथा वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी व अन्य मान्यवर उपस्थित होते.