मारूती मंदिर सर्कल येथील शिवरायांची अश्वारूढ मुर्ती व चौथ-याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नगरपरिषदेकडून मारूती मंदिर‌ येथे सुरक्षा रक्षकांची केलेली नेमणूक फक्त कागदोपत्रीच

मद्यप्रशान केलेत तरुणांकडून पुतळ्याजवळ आक्षेपार्ह फोटोग्राफी

रत्नागिरी: प्रतिनिधी

रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

मद्यप्राशन केलेल्या अवस्थेतील २ मुस्लिम तरूण लॉक असलेल्या गेटवरून चढून चौथ-यावर, शिडीवर तसेच मावळ्यांच्या खांद्यावर हात ठेवून, तोफेवर पाय ठेवून आक्षेपार्ह फोटो काढत असल्याचे निदर्शनास आलेत.

ही घटना बुधवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री घडली

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी संघटनेच्या सदस्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच तात्काळ त्यांना चौथ-यावरून खाली घेऊन तळीरामांना प्रसाद देण्यात आला व पुढील कार्यवाही साठी सिटी पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले. त्यातील एकाचे नाव साजन शेख व करीम शेख दोघेही रा.‌कोकणनगर (मूळ : पश्चिम बंगाल) असे आहे

परराज्यातून म्हणजे पश्चिम बंगाल मधून आलेले हे तरूण बांगलादेशी असावेत असा आमचा संशय आहे व त्यांची योग्य ती पडताळणी व्हावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.