वाहन चालकांनी सावधान राहून वाहने चालवण्याचे आवाहन
साखरपा वार्ताहर:
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गांवरील दक्खन ते कळकदारा यांच्यामध्ये महामार्गांवर दरड कोसळण्याचे प्रकार सुरु असून आज सकाळी नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सद्य स्थितीत दक्खन ते कळकदरा हा एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ही भली मोठी दरड सद्या वाहतूक सुरु असलेल्या महामार्गाच्या अत्यंत जवळ आली आहे. चार पदरीच्या मधोमध लोखंडी कंपाउंड असल्यामुळे दरड वाहतुकीच्या मार्गांवर आली नाही. मात्र काही दगडीचे तुकडे आले असून वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. पाऊसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहन धारकांनी वाहने सावधतेने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे.












