एल.टी.टी. इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) : खेड येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल.टी.टी. इंग्लिश मिडिअम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेत प्राची सचिन काळे, प्रसाद रतिश धामणकर, प्राजक्ता महादेव केळकर, वेदिका प्रमोद मोरे, स्तुती विनायक जैन आणि सिद्धी जनार्दन जाधव या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, पालक आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेणे, विलीन पाटणे, माजीद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय सर, एल्सी जॉय मॅडम, मुख्याध्यापक जी. बी. सारंग सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे सहाय्यक शिक्षिका जागुष्टे मॅडम, कांचनकोटी मॅडम आणि जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.