शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल लांजा चे सुयश

लांजा (प्रतिनिधी) इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल लांजा च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेटये कनिष्ठ महाविद्यालय लांजा’ या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर गुणवत्ता यादीत स्थान मिळवून या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या आणि लांजा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी: आदित्य संतोष पेडणेकर आणि दृष्टी रवींद्र डोळस. तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता मिळवणारी विद्यार्थी
भक्ती दत्ताराम गोरे, अविष्कार रमेश कांबळे, स्वाती अंकुश जाधव, सांची महावीर अलमाने, अदिती अमोल जाधव, पूर्वा राजेंद्र भुर्के आणि धनुष्का धनाजी हजारे यांनी सुयश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेटये, उपाध्यक्ष राजू कुरूप, सचिव
​ महेश सप्रे, सर्व संचालक वर्ग तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सहाय्यक पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले आहे.