बोरघर येथे एर्टिगा कारचा भीषण अपघात; ५ जण जखमी, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरघर येथे आज सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एर्टिगा कारचा अपघात झाला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाले. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि जय हिंद ॲम्बुलन्स सर्व्हिसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. बचावकार्यात अनिकेत हंबीर, ऋषी दरेकर, १०८ रुग्णवाहिका सेवा, जय हिंद ॲम्बुलन्स सर्व्हिस तसेच नऊ घोलप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.